Talegaon : किशोर आवारे खून प्रकरणात भानू खळदे याचाही सहभाग

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची 12 मे रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर हत्या करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला गौरव खळदे याने सुपारी देऊन हत्या घडवून आल्याचे समोर आले (Talegaon )होते. त्यानंतर आता या प्रकरणात गौरवचा पिता चंद्रभान उर्फ भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

किशोर आवारे आणि भानू खळदे यांनी जनसेवा विकास समितीची स्थापना केली होती. दरम्यान, नगरपरिषद कार्यालयात आवारे आणि खळदे यांचा वाद झाला. तिथे आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून भानू खळदे याचा मुलगा गौरव याने सुपारी देऊन आवारे यांची हत्या घडवून आणली. हे चित्र आजवर समोर आले होते.

Kothrud : पं.मनीषा साठे सादर करणार ‘नृत्यार्पिता’

मात्र, या हत्या प्रकरणात स्वतः भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आवारे यांची हत्या झाल्यापासून भानू खळदे हा देखील पसार झाला आहे.

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, “आवारे खून प्रकरणात भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस पथके भानू खळदे याच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.”

‘ती’ फिर्याद खोटी ठरणार का ?

भानू खळदे याने मागील काही महिन्यांपूर्वी शिरगाव पोलीस ठाण्यात त्याचे परवानाधारक पिस्तुल हरवले असल्याची फिर्याद दिली होती. त्याचं पिस्तुलातील काडतुसे किशोर आवारे यांच्या शरीरात सापडली. त्यानंतर गौरव खळदे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर यामध्ये भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे भानू खळदे याने पिस्तुल आणि काडतुसे हरवल्याची दिलेली फिर्याद खोटी ठरणार का. दिशाभूल करण्यासाठी ही फिर्याद देण्यात आली होती का. तसेच या हत्या प्रकरणाचा कट मागील काही महिन्यांपासून शिजत होता का, या सर्व प्रश्नांची उत्तरे भानू खळदे याच्याकडे तपास केल्यानंतर (Talegaon ) मिळतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.