Pimpri : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री प्रकरणी पिंपरी पोलिसांनी ( Pimpri ) दोघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी पावणे आठ वाजता साई चौक, पिंपरी येथे करण्यात आली.

बिशम मंगतराम पहुजा (वय 44, रा. साई चौक, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दिनेश तीर्थानी (वय 40, रा. पिंपरीगाव) याच्याकडून गुटखा आणल्याने दिनेश याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : किशोर आवारे खून प्रकरणात भानू खळदे याचाही सहभाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिशम याने त्याच्या घरात विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 95 हजार 260 रुपयांचा गुटखा जप्त केला. त्याला हा गुटखा दिनेश याने पुरवला असल्याचे समोर आल्याने त्याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिशम याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस ( Pimpri ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.