Talegaon Dabhade : सूर्यमुखी गणेश मंदिराचा 23 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – सालाबादप्रमाणे तिथीनुसार (फाल्गुन शुक्ल दशमी) बुधवारी (दि.1) आनंदवन श्री प्रतिष्ठानच्या सूर्यमुखी गणेश मंदिराचा 23 वा वर्धापनदिन (Talegaon Dabhade) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

वर्धापनदिन कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष सुलोचना आवारे व माजी उपनगराध्यक्ष व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गणेश काकडे यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व उपस्थित गणेश भक्तांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाविकजण उपस्थित होते.

सकाळी सत्यविनायकाची पूजा प्रणव व अर्चना पवार या उभयतांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर मोदकाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. अथर्वशीर्ष पठणानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती झाली व श्री दत्त भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला, सर्व आलेल्या गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वसंत पवार यांनी केले व उपस्थित सर्व गणेश भक्तांचे (Talegaon Dabhade) आभार प्रतिष्ठानचे खजिनदार सतीश लोखंडे यांनी मानले.

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; खडकीमध्ये अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.