Gahunje : कोर्टात केस केल्याने जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- कोर्टात केस केल्याच्या कारणावरून (Gahunje) एकाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी गहुंजे गावात घडली.

अविनाश हरिभाऊ बोडके (वय 42, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद ज्ञानेश्वर बोडके (रा. गहुंजे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश यांनी प्रमोद बोडके यांच्या विरोधात कोर्टात केस केली आहे. त्याचा राग मनात धरून प्रमोद यांनी अविनाश यांना लाकडी फाळके घेऊन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने पुन्हा कोयता घेऊन येत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत (Gahunje) म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Talegaon Dabhade : सूर्यमुखी गणेश मंदिराचा 23 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.