Talawade : मालाचे पैसे न देता 32 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- दुकानाचे नाव आणि जीएसटी नंबर वापरून मुंबई येथील दुकानदारास 67 लाख 79 हजार रुपयांच्या मालाची ऑर्डर दिली. त्यातील 32 लाख 60 हजार रुपये न देता फसवणूक केली. हा प्रकार 11 जुलै 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत तळवडे (Talawade) येथे घडला.

शरण बसप्पा सिद्धाप्पा कुंभार (वय 39, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंदेनवाज गुरुबादशहा मलगान, बशीद सय्यद (दोघे रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदेनवाज याने फिर्यादी कुंभार यांच्याकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने स्वामी समर्थ इंटरप्रायजेस फर्म आणि तिचा जीएसटी नंबर तयार केला. त्याचा कुंभार यांच्या परस्पर वापर करून मुंबई येथील अरिहंत स्टील या दुकानात 67 लाख 79 हजार 866 रुपये किमतीचा स्टील माल खरेदी करण्याची ऑर्डर दिली.

पर्चेस ऑर्डरवर सय्यद याचा मोबाईल क्रमांक दिला. दोन बँकांमध्ये बनावट खाते उघडून अरिहंत स्टीलकडून घेतलेल्या मालापैकी 32 लाख 60 हजार 104 रुपये न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Gahunje : कोर्टात केस केल्याने जीवे मारण्याची धमकी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.