Chinchwad : अनेक दिग्गज विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या श्री साईनाथ बालक मंदिराचा मंगळवारी 51 वा वर्धापनदिन

एमपीसी न्यूज – अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक समीर विद्वांस, टाटा रिसर्च सेंटरचे कॅन्सर विभाग प्रमुख डॉ. चेतन धामणे ते नासामध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी…अशा अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या श्री साईनाथ बालक मंदिराचा 51 वा वर्धापनदिन (Chinchwad) सोहळा येत्या मंगळवारी (दि.7) साजरा केला जाणार आहे.

हा सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड देवस्थानचे अध्यक्ष मंदार देव महाराज, ज्ञानप्रबोधिनी शाळेचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, शाळेच्या पहिल्या बॅचचे म्हणजे 1972 बॅचचे पालक भालचंद्र महादर, त्याच बॅचचे विद्यार्थी विलास भोईर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहे.

श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल धामणे, उपाध्यक्ष प्रा. रजनीकांत बेलसरे, सचिव निशा बेलसरे, कोषाध्यक्ष प्रसाद गणपुले, श्री साईनाथ बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर, कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्री साईनाथ बालक मंदिर ही शाळा 1972 सालापासून सुरु करण्यात आली. आजपर्यंत 5 हजार विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहेत. ज्यामधील अनेक विद्यार्थी त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम पदावर कार्यरत आहेत.

शाळेचे प्रमुख ध्येय 3 ते 5 वर्षातील मुलांच्या सर्वांगीण विकास हे आहे. यात केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर खेळ, संगीत, पाठांतर, संवाद आदी गुणामध्ये मुलांना निपूण केले जाते. आजमितीला शाळेत 10 कर्मचारी कार्यरत आहेत. श्री साईनाथ बालक मंदिर ही शाळा ज्ञानदानाचे कार्य कोणत्याही डोनेशन शिवाय केवळ विद्यार्थ्यांच्या फीवर करते. तीही केवळ वर्षभरासाठी 25 हजार एवढी आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेली पारितोषिक – (1973 ते 2023)

चिमुकल्यांनी येथे केवळ शिक्षण घेतले नाही तर किराड ट्रस्ट नाथ पै संस्कार, महाराष्ट्र मंडळ, आपटे प्रशाला, महेश विद्यालय, संस्कार जत्रा बाल जत्रा, दिवाकर नाट्यछटा स्पर्धा, जैन प्रसारक मंडळ, समर्थ शिक्षण मंडळ यांचे पुरस्कार विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत.

आत्तापर्यंत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे विद्यार्थी – Chinchwad

सिनेक्षेत्रात अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक समीर विद्वांस, टाटा रिसर्च सेंटर कॅन्सर विभाग प्रमुख डॉ. चेतन धामणे, नासामध्ये कार्यरत असणारे संजय बेलापुरे, संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अक्षय घाणेकर, शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. प्रा. शिल्पागौरी गणपुले, औद्यागिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे साई प्रकाश बेलसरे, रुद्राणी नाईक… कीर्तनातून समाज प्रबोधन. पल्लवी बोकील,.. शिक्षण क्षेत्रात कामगिरी  प्रियंका कलमदानी.. आर्किटेक्ट. प्रियांका कार्लेकर.. वकील. सामाजीक कार्यकर्ते डॉ. संजाली बुटाला, अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ. सागर धामणे, संगणक क्षेत्रातील विशेष कामगिरी.. समीर गणपुले सामाजिक क्षेत्रात राजेंद्र गावडे, निलेश डोके, विलास भोईर अशी अनेक नावे आहेत जी आता शाळेतून मिळालेल्या संस्कारातून त्यांचे भविष्य घडवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.