TATA Motors : टाटा मोटर्सने गाठला पाच दशलक्ष उत्पादनाचा टप्पा

एमपीसी न्यूज : टाटा मोटर्सने (TATA Motors) पाच दशलक्ष प्रवासी वाहनांची निर्मिती करून नवा विक्रम केला आहे. टाटा मोटर्सने 1991 मध्ये प्रवासी वाहने बनवण्यास सुरुवात केली होती. तीस वर्षात टाटा मोटर्सने पाच दशलक्षाचा टप्पा गाठला आहे.

टाटा मोटर्सने 1991 साली सिएरा या पहिल्या मॉडेलची निर्मिती केली. त्यानंतर 1994 मध्ये इस्टेट आणि सुमो हे मॉडेल होते. तेव्हापासून इंडिकासह अनेक मॉडेलची निर्मिती केली.

टाटा मोटर्सने 2004 मध्ये 1 दशलक्ष उत्पादनाचा टप्पा गाठला होता. तर दुसरा सहा वर्षांनंतर 2010 मध्ये दशलक्ष उत्पादन आला, त्याने 2015 मध्ये तीस दशलक्षचा टप्पा ओलांडला आणि शेवटी 2020 मध्ये 4 दशलक्षचा टप्पा ओलांडला. या (TATA Motors) ब्रँडने तीन वर्षांत शेवटचा दशलक्ष टप्पा गाठला.

Chinchwad : अनेक दिग्गज विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या श्री साईनाथ बालक मंदिराचा मंगळवारी 51 वा वर्धापनदिन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.