Chinchwad : टाटा मोटर्सकडून तालेरा रुग्णालयाला सोनोग्राफी मशिन

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स व सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या ( Chinchwad ) वतीने चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालयास सोनोग्राफी मशीन भेट देण्यात आली. या मशिनचा शुभारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.

Bhosari : टास्कच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. संगीता तिरुमणी,  सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे श्याम सिंग, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, टाटा मोटर्स कामगार युनियनचे कार्याध्यक्ष अशोक माने, डॉ. प्रकाश साखळकर आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीतून रुग्णालयास भेट म्हणून मिळालेल्या या मशिनचा उपयोग शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना होईल. शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून पुरविली जाते. महापालिकेच्या या प्रयत्नांना मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनमुळे पाठबळ मिळाले ( Chinchwad ) आहे.    

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.