Talegaon Dabhade  : रोटरीच्या माध्यमातून शहरातील दोन शाळांमध्ये स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून (Talegaon Dabhade ) सेन्साटा टेक्नालाॅजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे व भैरवनाथ विद्या मंदिर वराळे या शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. त्या कामाचे भूमिपूजन बुधवारी  (दि. 21) रो. अध्यक्ष उद्धव चितळे यांच्या हस्ते संपन्न झाले. दोन्ही शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधले जाणार आहेत.

या प्रसंगी रो.उपाध्यक्ष कमलेश कारले,रो.फर्स्ट लेडी अर्चना चितळे रो. महेश महाजन रो.राजेंद्र गोडबोले, रो.अरुण बारटक्के,रो.भालचंद्र लेले,रो.निलेश कुमार वाघचौरे,रो ऋषिकेश कुलकर्णी,पब्लिक इमेज को.डायरेक्टर डिस्ट्रिक्ट तसेच रो. सचिव प्रमोद दाभाडे, माजी अध्यक्ष  विश्वनाथ  मराठे, रो.निलेश भोसले, रो.धनंजय मथुरे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे,संस्थेचे जेष्ठ सदस्य यादवेंद्र खळदे,सोनबा गोपाळे गुरुजी, प्रा वसंतराव पवार,कांबळे मॅडम  उपस्थित होते.

PCMC :  थकबाकीदारांची धाबे दणाणले, नावे जाहीर करणार

याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे जेष्ठ सदस्य यादवेंद्र खळदे,  शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर व पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करून शाल व पर्यावरण पूरक रोप देऊन सत्कार करण्यात आला.

रो. अध्यक्ष उद्धव चितळे यांनी आपल्या मनोगतातून रोटरीयन तर्फे विविध प्रकल्प राबवले जातात व या माध्यमातून अनेक शाळांना या स्वरूपाची मदत करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्या सोबतच शारीरिक आरोग्याला देखील महत्त्व आहे आणि हे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतागृहाची आवश्यकता असते  .

याचीच काळजी घेण्यासाठी या शाळेची निवड करून पहिल्या टप्प्यात मुलींसाठी अत्याधुनिक  स्वच्छतागृह बांधून देण्याच्या कामकाजात सुरुवात केली आणि दुसऱ्या टप्प्यात मुलांसाठी स्वच्छतागृह बांधकाम करून देण्यात येणार आहे. यादवेंद्र खळदे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेचे उपक्रमशील सचिव संतोष खांडगे यांनी शिक्षणाबरोबर मुलींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

सर्व रोटरीयन उपस्थित सदस्यांचे शाब्दिक स्वरूपात आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पोटे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य (Talegaon Dabhade ) लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.