Pune : मेट्रो व सायन्स पार्कच्या सफरीने हरखली मुले

एमपीसी न्यूज – मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी…चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल… समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे… सायन्स पार्क मधील तारांगणात जमिनीवर ( Pune) राहून आकाशात मारलेला फेरफटका… लढाऊ विमानाची प्रतिकृती… मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरखलेली मुले… असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला.

वंचित विकास तर्फे अभिरुची वर्ग, फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले. तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

Talegaon Dabhade  : रोटरीच्या माध्यमातून शहरातील दोन शाळांमध्ये स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन

जनता वसाहत, दांडेकर पूल, अप्पर-सुप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड आदी 15 वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला. यावेळी 200 मुले व 50 हून अधिक पालक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली. मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे, अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालीया यांसह अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तर सहलीचे नियोजन तेजस्विनी थिटे यांनी ( Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.