Talegaon Dabhade : स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलास कपाट व एक महिन्याचे रेशन वाटप

एमपीसी न्यूज – नारायणराव काळोखे नागरी सहकारी(Talegaon Dabhade) पतसंस्था मर्यादित यांच्या सौजन्याने व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी यांच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलास एक महिन्याचे रेशन व गोदरेज कपाट वाटप करण्यात आले. हा समारंभ नुकताच गुरुकुल मध्ये संपन्न झाला.

महाराष्ट्रातल्या विविध भागातील गरीब होतकरू आर्थिक मागास कुटुंबातील 47 विद्यार्थी या गुरुकुलात शिक्षण घेत आहेत. रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुलचे अध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी केले. त्यांनी गेल्या पंचवीस वर्षाचा गुरुकुलचा इतिहास कथन केला. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन विलासराव काळोखे यांनी केले. तर रोटरीच्या कार्याची माहिती दिलीप पारेख यांनी दिली.

राज्याच्या विविध भागातील गरीब घरातील मुलांसाठी तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची मदत करू असे प्रतिपादन अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी केले.

निवृत्त शिक्षकांच्या सहकार्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण ज्ञानदानाचे काम करणार असल्याची ग्वाही सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले तर उपाध्यक्ष किरण ओसवाल यांनी आभार मानले सदर प्रसंगी गुरुकुलच्या वतीने विलास काळोखे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

संजय मेहता, संजय वाघमारे, प्रशांत ताये, सुनील महाजन, संतोष शेळके, शरयू देवळे,रामनाथ कलावडे, सुनंदा वाघमारे,तानाजी मराठे, रघुनाथ कश्यप इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम (Talegaon Dabhade) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.