Talegaon Dabhade : आहार, विहार, विचार ही त्रिसुत्री पाळा आणि आजार टाळा

एमपीसी न्यूज – इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतननगर(Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचा कार्यक्रम वतननगर येथील गणेश मंदिरात नुकताच संपन्न झाला. कार्ड काढण्यासाडी सुमारे 300 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी आहार, विहार आणि विचार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ मिलिंद सरदार यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसमोर आरोग्यासंबंधी विचार मांडले. ज्येष्ठ नागरिकांनी आपला आहार, विहार आणि आपले विचार कसे असावेत या त्रिसुत्रीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयुष्यमान भारत (आ.भा) कार्ड अंतर्गत आरोग्य संरक्षण मिळण्यासाठीचा 05 लाखाचा विमा मिळण्यासाठीचा या आयुष्यमान भारत कार्ड उपयोग सर्व ज्येष्ठ नागरिकांना होईल असे लाभदायक आभा कार्डसाठी सुमारे 300 ज्येष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाप्रसंगी डाॅ मिलिंद सरदार (Talegaon Dabhade)आणि त्यांचे सर्व डाॅ सहका-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणपतराव काळोखे गुरूजी, उपाध्यक्ष सिताराम भोजने, साहेबराव गावडे सर,कार्याध्यक्ष दामु चोरघे, राम जाट,चंद्रकांत हेंद्रे, रघुनाथ कुचिक, माधव जोशी, प्रकाश भोकरे,संजय भागवत आणि इतर ज्येष्ठ नागरीकांचे सहकार्य लाभले.

 

Loksabha : शिरूर, मावळ लोकसभा लढायची आणि जिंकायची; मनसेच्या बैठकीत निर्धार

ज्येष्ठ नागरिक संघाकडून वर्षभरात आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम,तसेच सहलीचे आयोजन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त सत्कारमूर्तीच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला जातो. अशी माहिती संघाचे अध्यक्ष गणपतराव काळोखे गुरूजी व कार्याध्यक्ष दामु चोरघे यांनी दिली. प्रास्ताविक रघुनाथ कुचिक यांनी केले तर आभार साहेबराव गावडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.