Loksabha : शिरूर, मावळ लोकसभा लढायची आणि जिंकायची; मनसेच्या बैठकीत निर्धार

एमपीसी न्यूज – शिरूर आणि मावळ लोकसभा (Loksabha) मतदारसंघाची 2024 ची लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि जिंकायची असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची बैठक रणजित शिरोळे (Loksabha)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मनसे नेते अमेय खोपकर, महेश जाधव, सिने अभिनेते व मावळ लोकसभेचे संघटक रमेश परदेशी व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त आमदार येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत. आपला भगवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे.

महाराष्ट्रातील विविध समस्यांना वाच्या फोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करावे. रणजित शिरोळे म्हणाले, पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा , कर्जत विधानसभा,पनवेल विधानसभा,उरण विधानसभा, व मावळ विधानसभा , यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद आहे. मनसैनिकांनी एक दिलाने एक जोमाने कामाला लागावे मनसेचा हक्काचा खासदार निवडून येईल.

Chinchwad : वास्तू रचनाकाराने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – वासवी मुळे

बाबू वागस्कर म्हणाले, शिरूर मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण(Loksabha)सेनेचे ताकद मोठ्या प्रमाणात आहे. पुढील भवितव्य खूप चांगले आणि मोठे आहे.

पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात चांगलं झालेला आहे, अजून जोमाने कामाला लागावे. शिरूर मतदार संघाची बांधणी चांगली करा शिरूर मतदार संघात खासदार हा मनसेचा झाला पाहिजे.

अजय शिंदे म्हणाले, भोसरी विधानसभा शिरूर मतदार संघासाठी निर्णायक आहे यासाठी शहरातील नागरिकांच्या ज्या समस्या असतील, त्याला वाच्या फोडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.

शिरूर व मावळ लोकसभा संघाची बांधणी आढावा बैठक घेत असताना पिंपरी विधानसभा, भोसरी विधानसभा,व चिंचवड विधानसभा, या तिन्ही विधानसभा सुमारे तीनशे जणांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

11 नव्याने शाखाध्यक्ष नेमण्यात आले. शहराध्यक्ष सचिन चिखले, उप शहराध्यक्ष राजू सावळे, विशाल मानकरी , बाळा जाणवले, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरसे , मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष, हेमंत डांगे, अनिकेत प्रभू, महिला सेनेचे अध्यक्ष सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर , महावीर कर्णावर, सचिन शिंगाडे विनोद भंडारी, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुशांत साळवी, जयसिंग भाट, श्रद्धा देशमुख उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.