Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचा पदग्रहण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे  येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचा 31वा पदग्रहण सोहळा (Talegaon Dabhade) उत्साहात संपन्न झाला. सन 2023-24 या रोटरी वर्षासाठी अध्यक्ष रो उद्धव चितळे, उपाध्यक्ष रो कमलेश कारले, सचिव म्हणून श्रीशैल मेंथे यांनी तर इतर 17 कार्यकारी सदस्यांनी प्रांतपाल मंजू फडके तसेच सहायक प्रांतपाल विनय भुजबळ यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला.

PCMC : …म्हणून अतिरिक्त आयुक्तांना रुजू करुन घेण्यास विलंब

प्रांतपाल मंजू फडके यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे हा प्रांत 3131 मध्ये आपल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे एक नाव लौकीक असलेला क्लब असून, नूतन अध्यक्ष उद्धव चितळे आणि टीम येणाऱ्या वर्षात नक्कीच ठसा उमटवणारे काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

 

नूतन अध्यक्ष उद्धव चितळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “आम्ही मागील अनेक वर्ष सामुदायिक विवाह सोहळ्याचे  यशस्वीरित्या आयोजन केले. क्लबचा आदर्श घेत विविध संस्थांनी मावळातील इतर भागात सामुदायिक विवाह सोहळे चालू केले. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. शवदाहिनी प्रकल्प, आरोग्य, पर्यावरणपूरक, गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत क्लब वेळोवेळी करत आलेला आहे. या वर्षी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, बचत गट व छोट्या व्यावसायिकांसाठी रोटरी फेस्ट, शेतकऱ्यांसाठी शेती उपकरणांची बँक, आरोग्य शिबिर, गाव दत्तक योजना, गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण असे विविध प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्णत्वास नेऊ असा विश्वास  व्यक्त केला.

माजी अध्यक्ष अनिश होले यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त करत नवीन टीमला शुभेच्छा दिल्या.

रो राजेंद्र गोडबोले,मृणालिनी गोडबोले,अश्विनी देशपांडे व प्रसाद मुंगी यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्मित क्लब रोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.क्लबच्या तीस वर्षांच्या कालखंडातील सक्रिय माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

नूतन सचिव श्रीशैल मेंथे यांनी सेक्रेटरी अनाउन्समेंट केली.सूत्रसंचालन नीलिमा बारटक्के यांनी केले, आभार  उपाध्यक्ष कमलेश कारले यांनी मानले.या वेळी रोटरियन्स, राजकीय, सामाजिक,शैक्षणीक व औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्य॔वर उपस्थित होते.फर्स्ट लेडी अर्चना चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदग्रहण समितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम (Talegaon Dabhade) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.