PCMC : …म्हणून अतिरिक्त आयुक्तांना रुजू करुन घेण्यास विलंब

एमपीसी न्यूज – मंत्रालयातून फोन आल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या विजयकुमार खोराटे यांना पदभार दिला जात (PCMC ) नसल्याचे समोर आले.

Pavana Dam update : धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; चोवीस तासात 9 मिमी पाऊस

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची राज्य शासनाने 6 जुलै रोजी बदली केली.  वाघ यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून विजयकुमार खोराटे यांच्या नियुक्तीचे गुरुवारी आदेश झाले. शासनाचा आदेश घेवून
खोराटे हे तातडीने शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी दिवसभर त्यांना रुजू करुन घेतले नाही.

आयुक्तांनी रुजू करुन घेतले नसतानाही खोराटे हे  अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात जावून बसले. त्यांनी महापालिकेच्या ई-मेल वरुन पालिकेत रुजू झाल्याचे शासनाला कळविले. दालनावर पाटी देखील लावली. वाहन वापरण्यासही सुरुवात केली. खोराटे यांनी शासनाला रुजू झाल्याचा ई-मेल करताच मंत्रालयातून आयुक्तांना फोन आला. आयुक्तांनी रुजू करुन घेतले नसल्याचे शासनाला कळविले. नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेल्या एका बड्या नेत्याने खोराटे यांना रुजू करुन घेवू नका असे तोंडी आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या अतिरिक्त आयुक्तांचा कालावधी संपला नव्हता. त्यांना मुदतपूर्वच बदलले असल्याचा मंत्र्यांचा दावा (PCMC )आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.