Pavana Dam update : धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; चोवीस तासात 9 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप वाढला (Pavana Dam update) नाही. गेल्या 24 तासात केवळ 9 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Today’s Horoscope 12 July2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 9 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  644 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  574 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 30.42 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 36.49 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 0.49 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 12.52 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.