Talegaon Dabhade : एनसीईआर महाविद्यालयास मिळाला ‘मेक इन इंडिया इमर्जिंन लीडर पुरस्कार’

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या महाविद्यालयास ‘मेक इन इंडिया इमर्जिंन लीडर २०२१ हा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील २०२१ या वर्षातील टॉप रँकचे कॉलेज म्हणून एनसीईआरला गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने डॉ. अपर्णा पांडे यांनी आयब्रॅक एशिया यांच्याकडून गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होणे यासाठी विविध औदयोगिक समूहासोबत काम करणे अपेक्षित असते. औदयोगिक भेटी, संशोधन कार्य, अंतिम वर्षातील प्रकल्प, उपलब्धीचा एकत्रित वापर, उद्योजकतेचे धडे , कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप आदी मुद्द्यांवर काम करता यावे म्हणून नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाने एकशे चाळीस हुन अधिक अस्थापनांशी सामंज्यस करार केले आहेत या सर्व बाबींचा पुस्कारामध्ये मोलाचा वाटा आहे.

संस्थेचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे, अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. ललितकुमार वधवा, डॉ. संजय क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.