Talegaon Dabhade : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून (Talegaon Dabhade)संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 8) तळेगाव दाभाडे येथे ही बैठक होणार असल्याची माहिती कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामदास काकडे,चंद्रकांत सातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार असून तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Pune :दिवाळी सणानिमित्त कारागृहातील बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

आर एम के उद्योग समूहाच्या कार्यालयामध्ये सदर पत्रकार परिषद पार (Talegaon Dabhade)पडली.यावेळी मावळ तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ,उपाध्यक्ष राजीव फलके, तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विशाल वाळूंज,तळेगाव शहर अध्यक्ष यादवेंद्र खळदे,जिल्हा सरचिटणीस योगेश पारगे,महिला अध्यक्षा प्रतिभा हिरे,प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी उपस्थित होते.

यावेळी काकडे म्हणाले सद्यस्थितीमध्ये पक्षामध्ये आलेली मरगळ दूर करून पक्षाचे संघटन वाढविणे आवश्यक आहे. तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे,विकास थांबला असून त्याला योग्य दिशा देणे गरजेचे आहे.

भविष्य काळामध्ये होणा-या नगर परिषद,जिल्हा परिषद आदी सर्व निवडणुका कॉंग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरच लढविणार. असे रामदास काकडे म्हणाले.
स्वागत पक्ष प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले. आभार युवक अध्यक्ष राजेश वाघोले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.