World cup 2023 : अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा श्रीलंकेवर 3 गड्यांनी विजय

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर श्रीलंका आणि बांगलादेश (World cup 2023)काल विश्वचषकात एकमेकांसमोर आले. दोन्ही संघांमध्ये काल अपेक्षेप्रमाणे खडाजंगी पाहायला मिळाली. अँजेलो मॅथ्यूज च्या टाईम आउट ते सामन्यानंतर दोन्ही टीमने एकमेकांशी हस्तांदोलन टाळणे , यामुळे कालचा सामना चर्चेत राहिला.

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा (World cup 2023)निर्णय घेतला.असलंका 101 धावांच्या शतकी खेळीमुळे निसंका 41, समरा विक्रमा 41, धनंजय डी सिल्वा 34 यांनी केलेल्या धावांमुळे श्रीलंकेने बांगलादेश ला 280 धावांचे लक्ष्य दिले.

प्रत्युत्तरात शांटो 90 धावा आणि कर्णधार शाकिब अल हसन 82 धावा यांनी केलेल्या खेळीचा जोरावर बांगलादेशने श्रीलंकेवर 3 गड्यांनी विजय मिळवला. दरम्यान, दोन्ही संघाने ठराविक अंतरावर गडी बाद करत सामन्यात रोमांच निर्माण केला. सामन्याच्या शेवटी शेवटी श्रीलंकेने बांगलादेशचे गडी बाद करण्यास सुरुवात केली, तथापि त्यांना सर्वांना बाद करणे शक्य झाले नाही.

NCP : उद्घाटनापूर्वीच शरद पवार गटाचे काळेवाडीतील पक्ष कार्यालय बंद !

सामना फलंदाजी गोलंदाजी पेक्षा “टाईम आउट” प्रकरणामुळे जास्त गाजला. श्रीलंकेचा फलंदाज समरविक्रमा बाद झाल्यावर अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्स मैदानावर आला, तो मैदानावर आल्यावर हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करत असताना हेल्मेटचे बेल्ट तुटले आहे त्याच्या लक्षात आले, त्यावेळी त्याने पवेलियनकडे दुसरे हेल्मेट आणण्याचे संकेत दिले, यामध्ये थोडा वेळ गेला. या दरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकीब ने पंचाकडे टाईम आउटची अपील केली.

या अपील वर पंचांनी अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला बाद ठरवले. यावेळी अँजेलो मॅथ्यूजने आपल्या हेल्मेटचे तुटलेले बेल्ट दाखवत पंच आणि बांगलादेशचा कर्णधार शाकिबल हसन याच्याकडे अपील मागे घेण्याचा आवाहन केले. यावेळी अपील मागे घेण्यात आली नाही आणि अँजेलो मॅथ्यूजला आल्या पावलाने माघारी परतावे लागले. त्यामुळे टाईम आऊट कारणावरून बाद होणारा जगातला पहिला फलंदाज अँजेलो माथूर ठरला.

आहे एमसीसीच्या नियमानुसार फलंदाज बाद झाला अथवा रिटायर्ड झाला, त्यानंतर पंचाणे खेळ थांबवला नाही, तर 3 मिनिटाच्या आत पुढील फलंदाजाने चेंडू खेळणे आवश्यक असते. जर तसे झाले नाही आणि विरोधी संघाने टाईम आऊटची अपील केल्यास फलंदाज बाद होऊ शकतो. तथापि, विश्वचषक 2023 या स्पर्धेसाठी हा कालावधी 3 मिनिटावरून 2 मिनिटे करण्यात आला आहे. हा निर्णय आयसीसी ने घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.