Talegaon Dabhade : माजी नगरसेवक गोपाळ परदेशी यांच्या शोकसभेचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे (Talegaon Dabhade) माजी नगरसेवक गोपाळ परदेशी यांचे रविवारी(दि 28) निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता दुर्गामाता मंदीर,भोईआळी तळयाजवळ तळेगाव दाभाडे येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाळ दगडू परदेशी(वय 54) यांचे रविवार 28.जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Pimpri : पिंपरीत संदीप वाघेरे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

राजकारण, समाजकारण व पत्रकारिता यात गोपाळ परदेशी सक्रीय होते.त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गुरूवार दि.1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दुर्गामाता मंदीर, भोईआळी,  तळयाजवळ तळेगाव दाभाडे येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेते मंडळींकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.