Bhosari : पोलिसात तक्रार दिली म्हणून पतीकडून पत्नीला पोलीस ठाण्या समोर मारहाण

एमपीसी न्यूज – पती विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून (Bhosari)पत्नीला पोलीस ठाण्या समोरच मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि,29) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्या समोर घडली.

याप्रकरणी पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari)मंगळवारी (दि.30) फिर्याद दिली. यावरून उमेश हिरामण हेंद्र (वय 31 रा. देहुगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : हडपसर येथे दोन मित्रांनी केला अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या आई, आजी या आरोपी विरोधात पोलीसांकडे तक्रार देऊन परतत असताना आरोपीने फिर्यादीला आडवले. माझ्या विरोधात तक्रार दिली म्हणून शिवीगाळ केलू तसेच लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.