Pune : हडपसर येथे दोन मित्रांनी केला अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; आरोपींना अटक

एमपीसी न्यूज : हडपसर येथे (Pune) एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.  या प्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी मुळा मुठा नदीपात्रा जवळ घडली. 

या प्रकरणी अनुराग साळवे (वय 21 वर्ष, रा. आनंदनगर केशवनगर मुंढवा) आणि गणेश अनिल म्हेत्रे (वय 23 वर्ष रा. शिंदे वस्ती मुंढवा पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी पीडितेचे मित्र आहेत.

Vadgaon Maval : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या 19 जागांसाठी 94 अर्ज

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 18.30 वाजल्यापासून ते रात्री 20.30 वाजेपर्यंत फिर्यादीच्या दोन मैत्रीणी यांचे मित्र अनुराग व गणेश यांनी पीडितेला फिरायला नेतो असे सांगून तिला गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेऊन व तेथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन दोघांनीही फिर्यादीवर बलात्कार करून तिला तेथेच सोडून निघून गेले. या (Pune) नंतर पीडितेने थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

आरोपींवर गु.र. क्र. व कलम- 203 /2024 भा द.वि कलम – 376,376 D A, सह 4,6,पोक्सो अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.