Talegaon Dabhade : गो-पालनातून युवकांना रोजगार मिळेल -भाऊराव कुदळे

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने वसुबारस पूजन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – ‘घरात माय आणि गोठ्यात गाय’ ही आपली संस्कृती असून भारतातील देशी गोवंश नामशेष होत आहे. गो-पालनातून युवकांना रोजगार मिळेल. गोरक्षण करणे ही आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय गो-रक्षक प्रमुख भाऊराव कुदळे यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब मैदानात शुक्रवार (दि.25) सकाळी 10 वा. वसुबारस पूजन सोहळा उत्साहात पार पडला. मारुती मंदिर चौक ते लायन्स क्लब मैदानपर्यंत ढोल-ताशाच्या गजरात गायींची मिरवणूक काढण्यात आली. शेकडो महिलांनी यावेळी गोपूजन केले. उपस्थितांना अल्पोपहार व देशी गायीचे दूध वाटप केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रांतपाल रवी धोत्रे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी अध्यक्ष विलास काळोखे, रोटरी क्लब अध्यक्ष मनोज ढमाले, सारिका शेळके, मनीषा काळोखे, हरिश्चंद्र गडसिंग, सीमा ढमाले, दिलीप पारेख, डॉ. शाळीग्राम भंडारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे, भाजपा युवमोर्चा प्रदेश सदस्य संतोष भेगडे, सुमतीलाल शाह, सेवानिवृत्त तहसीलदार रामभाऊ माने, तानाजी मराठे, सुभाष देसाई, महेश बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळातील प्रसिद्ध गोपालक रुपेश गराडे, दत्तात्रय भोईर व शंकर घारे आदींचा सत्कार करण्यात आला. सुमतीलाल शाह यांच्या वतीने मावळ तालुक्यातील प्रत्येकी गोशाळेला 5 टन गवत चारा पाठवणार असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब रिकामे, भगवान शिंदे, नितीन शाह, निलेश गराडे, संजय मेहता, विश्वास कदम, वैशाली खळदे, शरयू देवळे, रेश्मा फडतरे, सुनील महाजन, प्रदीप टेकवडे, आदींनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ढमाले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दाभाडे यांनी केले. रोटरी क्लबचे संस्थापक विलास काळोखे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.