Talegaon Dabhade : लॅटिस सोसायटीमध्ये तरुणांनी विविध उपक्रम राबवत साजरी केली शिवजयंती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील लॅटिस सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Talegaon Dabhade) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोहगडावर प्रज्वलित केलेली शिवज्योत आणली. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती, शस्त्र प्रदर्शन, व्याख्यान, मिरवणूक, शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, जाणता राजा महानाट्य आणि महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम राबवून महाराजांच्या चरित्राचा जागर करण्यात आला.

उत्सवाची सुरुवात लोहगडावरून शिवज्योत पेटवून झाली. त्यानंतर सुवासिनींच्या हातून शिवज्योतीचे स्वागत औक्षण करण्यात आले. महिलांकडून महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या पालखीतून शिवशाही पद्धतीने काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला बंधू-भगिनी, लहान, थोर सर्व पारंपारिक पोशाखामध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीचा समारोप शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आला.

संपूर्ण उत्साहाचा (Talegaon Dabhade) मुख्य आकर्षण असलेला जाणता राजा या महानाट्यातील शिवजन्माचा जिवंत नाट्य अविष्कार, कला दिग्दर्शक सुभाष शिरसाट यांनी 75 कलाकारांना बरोबर घेऊन सादर केला. या नाट्यातील केतकी दाते हिने साकारलेली मासाहेब जिजाऊची भूमिका विशेष आकर्षण ठरली.

महानाट्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली. प्रसिद्ध शिवव्याख्याते आशुतोष झा यांचे ज्वलंत देव देश धर्म या विषयावर व्याख्यान करण्यात झाले. यानंतर तळेगाव दाभाडे नगरीचे श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे सरकार व मासाहेब यांच्या हस्ते महाराजांची आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Khed : ‘व्यवसायासाठी माहेरून पैसे आण’ म्हणत विवाहतेचा छळ

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सुभाष शिरसाट यांनी केले. प्रस्ताविक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश भेगडे यांनी केले. मिताली देशपांडे आणि प्रीती महाजन यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन भेगडे, विवेक ठाकूर, किशोर भेगडे, संदीप शेलार, वैभव शिंदे, निरव पंचोली, सदानंद मोर्डे, राजेंद्र पंडित, अमित देशपांडे, संतोष माळी, नितीन अग्रवाल आणि आदित्य बुटाला सहकारी सर्व तरुण तरुणींनी अथक परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.