Talegaon : वडगाव फाटा येथे उलटला डंपर

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील (Talegaon) वडगाव फाट्यावर डंपर उलटला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव येथील वडगाव फाट्यावर गुरुवारी सकाळी डंपर उलटला. तळेगावकडून वडगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Akurdi : आकुर्डी ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला 120 टनांचा कंटेनर

अपघातामुळे वाहतूक कोंडी –

वडगाव फाटा येथे डंपर पलटी झाल्यानंतर चौकात वाहतूक कोंडी झाली. चौकात असलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. क्रेनच्या (Talegaon) सहाय्याने डंपर सरळ करण्यात आला. त्यावेळी वडगावकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी थांबविण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.