Akurdi : आकुर्डी ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला 120 टनांचा कंटेनर

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Akurdi) आकुर्डी ग्रेड सेपरेटर येथे एक अवजड कंटेनर अडकला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी घडली. दरम्यान वाहतूक एका लेनवरून सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अवजड कंटेनर जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात होता. निगडीकडून पिंपरीकडे येत असताना खंडोबा माळ चौकात पहिला ग्रेड सेपरेटर लागतो. कंटेनर आकुर्डी येथील ग्रेड सेपरेटर मध्ये आला असता उंचीचा अंदाज न आल्याने तो अडकला गेला.

यामुळे एका लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली. कंटेनर अडकल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच निगडी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे आणि त्यांच्या स्टाफने घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या कंटेनरच्या सहाय्याने अडकलेल्या कंटेनरला काढण्याचे काम दुपारपर्यंत सुरु होते. कंटेनरचे वजन तब्बल 120 टन एवढे प्रचंड असल्याने त्याला काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

Nigdi : नागरिकाकडून पीएमपीएमएल कंडक्टरला मारहाण

वारंवार घडतात घटना –

जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडीकडून येत असताना खंडोबा (Akurdi) माळ चौक, चिंचवड स्टेशन चौक, चिंचवड महावीर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी ग्रेड सेपरेटर आहेत. जुन्या महामार्गावर रस्त्याची कामे सातत्याने केली जात असल्याने या ग्रेड सेपरेटरची उंची काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे ठराविक उंचीपेक्षा अधिक उंचीची वाहने आल्यास ती ग्रेड सेपरेटरमध्ये अडकून पडतात. महामार्गावरून मोठ्या उंचीची वाहने जात असल्याने ग्रेड सेपरेटरची उंची वाढविण्याची गरज निर्माण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.