Nigdi : नागरिकाकडून पीएमपीएमएल कंडक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज – बस येथे का थांबवता? म्हणत निगडी (Nigdi) येथे बस कंडक्टरला एका नागरिकाने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.12) रात्री घडली आहे.

या प्रकरणी बस कंडक्टर प्रशांत विनायक देवरे (वय 33, रा.तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मारूती एरटिगा (एमएच 14 जे.एच.7365) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 33 – ‘विमी’ अर्श से फर्श पर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व बस चालक मधुकर माने हे कर्तव्यावर असताना आरोपी तेथे आला व त्याने काही कारण नसताना बस येथे का थांबवता? म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी यांनी मी डेपो मॅनेजर नाही, तू मॅनेजरला (Nigdi) बोल असे सांगितले. बसमध्ये चढून आरोपीने फिर्यादीची कॉलर पकडली व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिली. यात फिर्यादी जखमी झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.