Talegaon : आत्महत्येची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नासाठी नकार दिल्याने आत्महत्या (Talegaon) करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना तळेगाव येथे घडली.

अथर्व दत्तात्रेय जांभुळकर (वय 19, रा. जांभूळगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 22) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 एप्रिल ते 22 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे येथे घडली.

Chandrayaan 3 Live : काहीच क्षणात भारत रचणार इतिहास, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी ‘विक्रम’ सज्ज; पहा थेट प्रक्षेपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने ओळखीचा फायदा घेत फिर्यादी तरुणीला लग्नासाठी विचारणा केली. मात्र तिने लग्नास नकार दिला. तेव्हापासून आरोपी अथर्वने तिला आत्महत्या करून फिर्यादीला त्यात फसवण्याची धमकी देत होता.

तसेच तरुणीच्या घरासमोर तासन्‌तास थांबणे, कॉलेजमधून (Talegaon) सुटल्यावर घरी जात असताना रस्त्यात आडवून तिला गाडीवर बसण्यास जबरदस्ती करणे, गाडीवर बसण्यास नकार दिला असता हात पिरगळून फिर्यादीच्या पाठीत मारून शिवीगाळ करणे, असे प्रकार सुरू होते.

तू सोबत आली नाहीस  तर तुला मारून टाकेल, अशी धमकीही आरोपी अर्थवने दिली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.