Talegaon News : ट्रेलर चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून येवून कार ट्रेलर चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक  (Talegaon News ) केली आहे. ही घटना चाकण तळेगाव रोडवर मोहननगर कमानीजवळ बुधवारी (दि.12) घडली होती.

याप्रकरणी संजीत श्रीकाली ठाकूर (वय 25 रा.सोमाटणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हेमंत उर्फ पियूश बाळू धोत्रे (वय 21 रा. तळेगाव स्टेशन), अनिकेत दादाभाऊ धायबर (वय 22 रा. वतननगर) व सुमित राकेश गलीयल (वय 20 रा. तळेगाव स्टेशन) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Pimpri : पिंपरी येथून गांजासह दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रा सोबत कार ट्रेलर घेऊन महिंद्रा कंपनीकडे जात होते. यावेळी मोहननगर च्या कमानीजवळ (Talegaon News)आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी ट्रेलर थांबवला. यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला हाताने मारहाण करत खिशातील मोबाईल,स्पीकर,ब्लु-टूथ असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.