Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधाना विरोध केला म्हणून पत्नीला घराबाहेर काढले

एमपीसी न्यूज – पतीच्या विवाहबाह्य (Pune Crime)संबंधास पत्नीने विरोध केला. या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून घरातून हाकलून देत तिला नांदविण्यास नकार दिला. ही घटना 14 मे 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत काळेवाडी आणि हडपसर येथे घडली.

मनीष गजानन शेलार (वय 27, रा. हडपसर. मूळ रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon News : ट्रेलर चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेलार याने फिर्यादी विवाहितेला किरकोळ कारणावरून त्रास दिला. तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित लावून दिले नाही. लग्नामध्ये (Pune Crime) आमचा मानपान नीट केला नाही, असे म्हणत तुझ्या वडिलांकडून सोन्याची चैन व अंगठी मागवून घेण्याची मागणी आरोपीने केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत प्रेम संबंध असल्याचे फिर्यादीस समजल्याने त्यांनी त्यासाठी विरोध केला. त्यावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून घरातून हाकलून देत नांदविण्यास नकार देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.