Pimpri News: गुगल टॅगिंगद्वारे सोमवारपासून दिव्यांगांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज (Pimpri News) विकास विभागाच्या दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या शहरातील दिव्यांग नागरिकांच्या हयातीचा दाखल्याबाबत त्यांच्या घरोघरी जाऊन गुगल टॅगिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार असून 60 दिवसांपर्यंत सर्वेक्षण सुरु राहील, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीने दिव्यांग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. महापालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन अक्षांस व रेखांशवर नोंदणी करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण गुगल टॅगिंगनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचे फेस रिडींग, थम्ब इंप्रेशन व आयरीस ओळख मार्फत ऑनलाईन नोंदणी घेण्यात येणार आहे.

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधाना विरोध केला म्हणून पत्नीला घराबाहेर काढले

दिव्यांग प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी (Pimpri News) कागदपत्र स्कॅन करुन ऑनलाईन अपडेट केली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्यात दिव्यांग व्यक्तींचा फोटो, दिव्यांग प्रकारानुसार फोटो, फेस रिडींग, थम्ब इंप्रेशन व आयरीस ओळख, लाभार्थ्यांचे नाव, पत्ता आधार नंबर, मोबाईल नंबर तसेच पालकांचे पूर्ण नाव, पत्ता व आधार नंबर, मोबाईल नंबर नोंदविला जाणार आहे.

यासाठी मे. आयएसएफ सर्व्हिसेस या संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेचे ओळखपत्र धारक सर्वेअर हे शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना दिव्यांग नागरिकांनी सहकार्य करावे. मूळ कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. हयातीच्या दाखल्याबाबत महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.