Talegaon Dabhade : आंतर विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचा डंका

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत (Talegaon Dabhade) सोलापूर जिल्हा क्रीडा विभागामार्फत आंतर विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धा घेण्यात आली. या विभागीय मल्लखांब स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा 3 जानेवारी व 4 जानेवारी रोजी पार पडली.

या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटामध्ये गार्गी देशमाने हिने प्रथम क्रमांक पटकावला. नंदिषा कदम हिने चौथा, तर ईश्वरी गाडे हिने सहावा क्रमांक मिळविला आहे. तसेच 17 वर्षाखालील गटात गार्गी दाभाडे हिने पाचवा क्रमांक मिळविला आहे. या सर्व विजयी खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व विजयी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक संदीप शिंदे यांचे इंद्रायणी  विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी अभिनंदन केले.

Pimpri News: गुगल टॅगिंगद्वारे सोमवारपासून दिव्यांगांचे सर्वेक्षण

संस्थेच्या सर्वसोयींनी (Talegaon Dabhade)युक्त अशा भव्य क्रीडांगणाचा जास्तीत जास्त खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा असे मत संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुरेश थरकुडे यांनी वेटलिफ्टिंग,पॉवर लिफ्टिंग,मल्लखांब या खेळांबरोबरच  सकाळच्या सत्रात ॲथलेटिक्स व संध्याकाळच्या सत्रात फुटबॉल प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.