Pimpri : पिंपरी येथून गांजासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे सार्वजनिक ठिकाणी बसून गांजा सेवन (Pimpri) करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) दुपारी करण्यात आली.

चेतन मानतेश अलमिल (वय 22, रा. नेहरूनगर, पिंपरी), अमोल दत्ता शिंदे (वय 27, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी 24 जानेवारीपासून ‘कार्निवल’; आयुक्तांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सहकारी (Pimpri) उपनिबंधक कार्यालयाच्या जवळ आरोपी गांजा सेवन करत बसले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 100 रुपयांचा गांजा आणि इतर साहित्य जप्त केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.