Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर द्या – मुख्याधिकारी सरनाईक

एमपीसी न्यूज : नगरपरिषदेच्या शाळामधील मुख्याध्यापकांची (Talegaon Dabhade) शैक्षणिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नगरपरिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. सरनाईक यांनी पाचवी आणि आठवी मधील राज्य शिष्यवृती परिक्षा, एनएमएमएस परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना लागणारी विशेष शैक्षणिक मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

नगरपरिषदेच्या शाळामधील मुख्याध्यापकाच्या शैक्षणिक आढावा बैठकीत सरनाईक हे बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, मुख्याध्यापिका सुरेखा जाधव,प्रकाश जाधव, केशव चिमटे, संध्या कुलकर्णी शोभा कांबळे, संजय चांदेरे, भाऊसाहेब सावकार, योगीता शिंदे, अमोल पाटील, शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लेखनिक बाळासाहेब जबर, मयुर मुळे आदी उपस्थित होते.

Pimpri : पिंपरी येथून गांजासह दोघांना अटक

यावेळी मुख्याधिकारी सरनाईक यांनी (Talegaon Dabhade) नगरपरिषदेच्या शाळेमधील इयत्ता पाचवीच्या आणि इयत्ता आठवीमधील राज्य शिष्यवृती परिक्षा, एन.एम.एम.एस परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांच्यासाठी करण्यात येत असलेले विशेष प्रयत्न यांचा आढावा घेतला. तसेच त्यांना लागणारी विशेष शैक्षणिक मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

तर, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी शिष्यवृती परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तसेच शिक्षकांकडून होत असलेले ज्यादा नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.