PCMC : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी 24 जानेवारीपासून ‘कार्निवल’; आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज – शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक, नावीन्यपूर्ण विचार वाढ (PCMC) आणि महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ यासाठी विद्यार्थी व शालेय स्तरावर ‘जल्लोष शिक्षणाचा’ स्पर्धा बुधवारपासून सुरू आहे. त्याअंतर्गत 24 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान आनंदोत्सव (कार्निवल) आयोजित केला आहे.

याबाबतची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. जल्लोष शिक्षणाचा उपक्रमाअंतर्गत 14 ते 20 डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये माहिती पत्रक प्रसारित करण्यात आले. 26 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत मूल्यमापन समितीने शाळांना भेट देऊन पडताळणी केली. 18 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान आणि पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता आदी विषयांवर अंतर्गत स्पर्धा झाली. शालेय स्तरावर स्पर्धेत चार विद्यार्थ्यांचा गट असेल. सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर मॉडेल, केसपेपर, अहवाल, सादरीकरणे आदी विकसित करणे अपेक्षित आहे. त्यातूनच शिक्षक आणि मुख्याध्यापक एक गट निवडण्याचा निर्णय घेतील.

Pimpri news: डॉ. डी. वाय. पाटील प्रीस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

15 जानेवारी रोजी प्रत्येक शाळेतील निवडलेला गट आंतरशालेय स्पर्धेसाठी नोंदणी करेल. ज्यामध्ये (PCMC) गटाला दोन दिवसीय कार्निव्हलमध्ये त्यांचे मॉडेल सादर करण्याची संधी मिळेल. कार्निव्हलला भेट देणाऱ्या इतर शालेय विद्यार्थ्यांना मॉडेल समजावून सांगण्यासाठी त्यांना कार्निव्हलमध्ये एक स्टॉल दिला जाईल. कार्निव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पाच मॉडेल्सना बक्षीस देण्यात येईल.

शिक्षणाचा जल्लोष उपक्रमांतर्गत 24 ते 26 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. 24 व 25 जानेवारी रोजी आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, पुस्तकांचे स्टॉल, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, ट्रेझर हंट आदी निवडलेल्या गटांचे स्टॉल असतील. 26 जानेवारी रोजी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एचए मैदानावर एरोमॉडेलिंग शो होईल. महापालिका शिक्षण विभाग आणि सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) यांच्यामार्फत आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले आहे, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.