Pune : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई लेखा फार्मजवळ किवळे येथे गुरुवारी (दि. 12) रात्री करण्यात आली.

द्रोण सुनील मोरे (वय 22, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर रघुनाथ बोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी 24 जानेवारीपासून ‘कार्निवल’; आयुक्तांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील लेखा फार्मजवळ एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.