Hinjewadi News : कंपनीची फसवणूक करणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  – कंपनीने कामावरून काढून टाकल्यानंतर कंपनीने कामासाठी दिलेला लॅपटॉप व क्रेडिट कार्ड परत न करता त्याचा वापर करून कंपनीची 3 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आयटी अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा(Hinjewadi News)  दाखल करण्यात आला. हा प्रकार 7 एप्रिल 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत इंडिया प्रा ली, हिंजवडी येथे घडली.

 

सिद्धार्थ गायधर पाणीग्रही (वय 35, रा. वाकड. मूळ रा. बेंगलोर) असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रघुनाथ पाटील (वय 38  रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri news: डॉ. डी. वाय. पाटील प्रीस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे इंडिया प्रा ली या कंपनीत काम करत असताना कंपनीकडून त्यांना लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड वापरासाठी देण्यात आले होते. दरम्यान, सिद्धार्थ यांना कंपनीने कामावरून काढून टाकले. त्यानंतर कंपनीने दिलेले लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड कंपनीला परत करणे आवश्यक असताना (Hinjewadi News )त्यांनी ते परत न करता त्याचा स्वतःसाठी वापर करून कंपनीची 3 लाख 88 हजार 402 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.