Talegaon : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीनेच ; उर्से टोलनाक्यापाशी अजूनही वाहतूकीची कोंडी

एमपीसी न्यूज – बोरघाटात ( Talegaon) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ काल (रविवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास साडेचार तास ठपाप ठप्प झाली होती. साधारण पहाटे तीननंतर वाहतूकीला सुरुवात झाली.मात्र एवढ्या वेळ वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा परिणाम अजूनही दिसून येत आहे.उर्से टोलनाक्यापाशी अजूनही वाहतूकीची कोंडी झालेली असून वाहतूक संथ गतीने चालू आहे.

Today’s Horoscope 24 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

बोरघाटात( Talegaon) अमृतांजन पॉईंट व आडोशी बोगदा या दरम्यान किलोमीटर 41 जवळ रात्री 10.30  च्या सुमारास दरड कोसळली होती. दरड कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने जीवितहानी टळली.

दरड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

साधारण पहाटे तीननंतर वाहतूक सुरु झाली. मात्र एवढ्या वेळ वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा परिणाम उर्से टोलनाक्यापाशी अजूनही दिसत आहे. उर्से टोलनाक्यापाशी वाहतूकीची कोंडी झालेली असून वाहतूक अतिशय संथ गतीने चालू आहे.

Chakan : खेडमधील दरडप्रवण व पूरप्रवण स्थितीचा आढावा तयारीसाठी मॉक ड्रिल ; 2 गावे मृत्युच्या दाढेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.