Talegaon : तळेगाव स्टेशन येथील तलावात तरुण बुडाला; तरुणाला वाचवण्यात यश

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील तलावात (Talegaon) काही तरुण पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज मिळाल्याने एकजण बुडाला. बुडालेल्या तरुणाला बाहेर काढले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुंबई येथील काही तरुण तळेगाव स्टेशन येथे असलेल्या तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले. पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एकजण बुडाला.

घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, गणेश ढोरे, ओंकार भेगडे, शुभम काकडे, सर्जेस पाटील, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अधिकारी प्रविण माने, तळेगाव अग्निशमन दलाचे शेखर खोमणे, ताहीर मोमीन, रियाज मुलानी, शुभम काळोखे, अक्षय घोडेकर यांनी घटनास्थळी धाव (Talegaon) घेतली. तळेगाव दाभाडे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

Kothrud : चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांसाठी नाट्यपर्वणी

सर्वांनी एकत्र प्रयत्न करत पाण्यात बुडलेल्या तरुणाला बाहेर काढले. तळ्याच्या काठावर तरुणावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.