Pune : विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन विद्यार्थीनीला पास करण्यासाठी तिच्याकडे प्राध्यापकानेच शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणा-या या घटने प्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे. 
 

संदीप कांबळे (रा. वडगाव पठार,पुणे) असे अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. वडगाव बुद्रुक परिसरातील श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला.  संबंधित विद्यार्थीनी या महाविद्यालयात एफवायबीए वर्गामध्ये शिकत आहे. संदीप कांबळे हा विद्यार्थीनीला फोन करून ‘तुला पास व्हायचं  असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो’ म्हणून फोन करत होता. शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थीनीने याची माहिती आई-वडिलांना दिली.
 
तिच्या कुटुंबीयांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. हवेली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.