Nigdi : कॅशव्हॅनच्या कर्मचा-यावर वार करून 25 लाखांची रोकड पळवली (व्हिडिओ)

एक जखमी : यमुनानगर एलआयसी ऑफीसजवळील घटना

एमपीसी न्यूज – एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचा-यावर वार करून भरदिवसा चोरट्यांनी 25 लाख 51 हजारांची रोकड असलेली पैशांची बॅग पळविली आहे. ही घटना गुरुवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास निगडीतील यमुनानगरमध्ये घडली. या व्हॅनमध्ये यमुनानगर एलआयसी आणि आकुर्डी एलआयसी आणि एका मॉल मधील कॅश होती. तथापि घटना घडली त्यावेळी या बॅगमध्ये 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तपासाअंती 25 लाखांची रोकड पळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

महेश पाटणे (रा. हडपसर) असे जखमीचे नाव आहे. भाऊसाहेब चकाले (वय 38, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे व्हॅनचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी चेकमेट कंपनीची एमएच 02 एक्सए 4699 ही व्हॅन दुपारी सव्वाएकच्या सुमारास आली. पावणेदोनच्या सुमारास पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना व्हॅन मधील कर्मचा-यावर रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या चौघांनी वार केले. त्याला जखमी करून पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. या घटनेत कॅशव्हॅन मधील कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पळवून नेलेल्या बॅगमध्ये यमुनानगर एल आय सी कार्यालयातील 22 लाख, आकुर्डी एल आय सी कार्यालयातील 2 लाख 41 हजार आणि एका मॉलमधील 1 लाख 10 हजार रुपये अशी एकूण 25 लाख 51 हजार रुपये रक्कम होती. निगडी पोलीस तपास करीत आहेत. तथापि घटना घडली त्यावेळी या बॅगमध्ये 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तपासाअंती 25 लाखांची रोकड पळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षेचा निष्काळजीपणा कसा ?

पैसे जमा करण्यासाठी चेकमेट कंपनीची व्हॅन दररोज यमुनानगर एल आय सी कार्यालयात येते. या व्हॅनमध्ये दररोज एक चालक, एक कर्मचारी आणि एक सुरक्षारक्षक असे एकूण तीन लोक असतात. मात्र गुरुवारी व्हॅनमध्ये केवळ चालक आणि कर्मचारी असे दोघेच होते. दररोज असणारा सुरक्षारक्षक मागील आठ दिवसांपासून सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून दररोज बदलून सुरक्षारक्षक येत होता. तसेच ज्या ठिकाणी दररोज व्हॅन लावली जात होती. त्या ठिकाणी गुरुवारी व्हॅन न लावता रस्त्याच्या दुस-या बाजूला लावण्यात आली होती. त्यामुळे या प्रकारात पूर्णतः पैसे जमा करणा-या कंपनीचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.

घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

चेकमेट कंपनीचा कर्मचारी पैशांची बॅग घेऊन येत असताना त्याला दोन दुचाकींवरील चौघांनी वार करून त्याच्या हातातून पैशांची बॅग पळवून नेली. यामध्ये कर्मचा-याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. व्हॅनचालक, कर्मचारी आणि दोन दुचाकींवरील चौघांमध्ये झालेली झटापट परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.