Bhosari: विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील खर्च हा देशाच्या भविष्यावरील खर्च – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या शिक्षणावरील खर्च हा देशाच्या भविष्यावरील खर्च आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भोसरीतील साई मंदिर येथील ए.आर. इंटरनॅशनल स्कूलचे उद्‌घाटन नुकतेच गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, संस्थेचे संस्थापक व गडकरी यांचे वर्गमित्र अनिल आदमने, विदर्भ सहयोग निगडीचे डॉ. इंगोले, विदर्भ मित्रमंडळ भोसरीचे विनायक भोंगाडे, भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार, उज्ज्वला आदमने, निखिल आदमने, अंकुश आदमने, अनुराधा रावळ, सुनील रावळ, सावण रावळ आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ”शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्याची जबाबदारी सर्वच शिक्षण संस्थांची आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यातील संबंध चांगले असणे गरजेचे आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राबाबत रुची निर्माण करणे आवश्यक आहे. तरच शिक्षण सर्वसमावेशक होईल. याबरोबरच शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीनेही प्रयत्न सुरु आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.