Talawade traffic : आश्वासनानंतर राज्याचे उद्योगमंत्रीच अडकले तळवडेच्या ट्रॅफिकमध्ये

एमपीसी न्यूज – चाकणच्या भविष्यातील विकासासाठी आज (बुधवारी) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी विकासाच्या दृष्टीने अनेक सुचना केल्या व आश्वासने ही दिली.

मात्र त्यानंतर ते परिसरातून बाहेर येत असताना तळवडे येथील गणेश नगरच्या वाहतुकीत सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ते  अडकले. त्यामुळे आश्वासनानंतर खुद्द मंत्रीच वाहतूक कोंडीत अडकले अशी परिस्थिती निर्माण झाली.

तळवडे, चाकण परिसरातील वाहतुककोंडी तेथे राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या नोकरदारांसाठी नवीन नाही. त्यासाठी वेळोवेळी रुंद व सुसज्ज रस्त्यांची नेहमीच मागणी केली जात आहे. तळवडे येथील गणेशनगर भागातील रस्त्यांवर बॉटल नेक स्वरूपात ट्रॅफिक जमा होते. या भागात अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना तासंतास ट्राफिक जाम मध्ये अडकून पडावे लागते.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसा चांदणी चौक येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न वाहतूक कोंडीत अडकल्या नंतर मार्गी लावला, अगदी तसाच तळवडे,चाकण या भागातील वाहतूक कोंडी कडेही उद्योगमंत्र्यांनी गांभीर्याने पहावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

अर्थात बैठकीमध्ये उद्योगमंत्री सांमत यांनी रस्त्याच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे.या संदर्भात आवश्यक सुधारणा त्वरित करण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावेअशा सूचना ही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यामुळे आता तरी तळवडे व चाकणकडे गांभीर्याने पाहिले जाईल अशी अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.