Talegaon : विदेशातील गिफ्टचा मोह पडला महागात; 38 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तळेगाव दाभाडे येथील एका महिलेला विदेशातून महागडे गिफ्ट पाठवले असल्याचा बहाणा केला. ते गिफ्ट आणि पाठवलेली परदेशी रक्कम भारतीय चलनात रुपांतरीत करून देण्याच्या बहाण्याने महिलेची 37 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 9 जून या कालावधीत आनंदनगर, तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे घडला.

Chikhali : जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज दैव्यकुमार (रा. बर्मिंघम, यु के), डेरिक राजू (रा. नवी दिल्ली), बँक खातेधारक दिनेश गुप्ता, मनोज प्रजापती, नितेश रॉय, सुंजना दोरा, ओटोके असोमी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी पृथ्वीराज याच्यासोबत शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झाली. त्याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीला महागडे गिफ्ट्स आणि रोख रक्कम देण्याचा बहाणा केला.

पाठवलेले गिफ्ट्स आणि रोख रक्कम भारतीय चलनात रुपांतरीत करून देण्याचा आरोपी डेरिक राजू याने बहाणा केला. दोघांनी फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या बँक खात्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरोपींनी 37 लाख 88 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादीस कोणतेही गिफ्ट्स अथवा इतर रक्कम न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.