Pune : हिंजवडी येथील सोन्याच्या बिस्किटांच्या चोरी प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती

एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील सोन्याच्या बिस्किटांच्या चोरी प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती आले असून या गुन्ह्याच्या तपासासाठी युनिट 1 चे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.28) मध्यरात्री महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम जवळ घडली होती.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी बेहराराम पुरोहित रविवार पेठमधील समृद्धी ज्वेलर्स दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबईमधील जव्हेरी बाजारमधून अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून 100 ग्रॅम वजनाची 45 बिस्किटे घेऊन आज पुण्याकडे शेअरकार मधून येत होता. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमजवळ आल्यावर तो शेअर कारमधून उतरला.

टिंबर मार्केटकडे जाण्यासाठी तो एका रिक्षात बसला. यावेळी रिक्षामध्ये अन्य दोघेजण बसले. त्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून पुरोहितजवळ असलेली 45 सोन्याची बिस्किटे, रोख रक्कम व मोबाईल फोन, असा एकूण एक कोटी 35 लाख, 63 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला अशी फिर्याद बेहराराम पुरोहित याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.