Thergaon News : बस प्रवासात महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बसमधून प्रवास करत असताना महिलेचे दिड लाखांचे (Thergaon News) दागिने चोरीला गेले आहेत. हि घटना शनिवारी (दि.25) सकाळी थेरगाव पीएमटी बसमध्ये घडली.महिलेने वाकड पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Pune News : ‘सृष्टीज्ञान’ विज्ञान विषयक नियतकालिकाचे प्रकाशन

 

 पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या त्यांच्या कर्नाटक येथील गावी जात असताना निगडी येथून बसमध्ये बसल्या थरेगाव जवळ येताच महिलेच्या पर्समधून  1 लाख 47 हजार 500 रुपयांचे सोन्या चांदिचे दागिने चोरट्याने फिर्यादीच्या नकळत काढून घेतले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध (Thergaon News) घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.