Thergaon: “आनंददायी शिक्षणासाठी कलेची जोपासना आवश्यक”- अभिनेते जहिर पटेल

एमपीसी न्यूज – “अभ्यासाचा ताण हलका करून, आनंददायी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी कलेची (Thergaon)आवड जोपासने गरजेचे आहे .”असे प्रतिपादन अभिनेते जहिर पटेल यांनी केले.

थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेने आयोजित केलेल्या , कलाकौशल्ये शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक लक्ष्मण मोहरे, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले(Thergaon) ,दिलीप थोरात ,संतोष जंगम आदी मान्यवर उपस्थित होते. पटेल पुढे म्हणाले की “सध्याच्या काळात मनोरंजन क्षेत्रात चांगली संधी आहे. दिवसेंदिवस माध्यमांची संख्या वाढते आहे, मात्र त्यासाठी बालपणापासूनच कलेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.

 

दैनंदिन जीवनातही प्रत्येकजण वेळप्रसंगी अभिनय करत असतोच. चांगले बोलण्यासाठी, उत्तमप्रकारे व्यक्त होण्यासाठी, वाचिक अभिनयाची आवश्यकता आहे.

 

त्यासाठी स्पष्ट आणि शुद्ध उच्चारांचा सराव शालेय वयातच होणे गरजेचे आहे.” यावेळी मुलींनी कुतूहलापोटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी मुलींशी संवाद साधला. चित्रपटाचे चित्रीकरण, नाटकांची रंगीत तालीम. याबाबतचे काही किस्से आणि माहिती दिली. तसेच शब्दोच्चारासाठीचे व्यायाम व विविध हालचालींसह काही प्रात्यक्षिके करवून घेतली.

Mahalunge: कामगारांनीच कंपनीचा पावणे दोन लाखाचा माल चोरला, एकाला अटक

पर्यवेक्षक मोहरे यांनी शालेय वयात अन्य संस्कारांबरोबरच कलेचा संस्कारही होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता आहे.” असे मत व्यक्त केले. या शिबिराच्या दरम्यान चित्रकला ,हस्तकौशल्ये संगीत, इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. राधिका भोईटे यांनी प्रास्ताविक केले तर शुभांगी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराचे संयोजन कलाशिक्षिका मुक्ता धोंगडे व वैशाली माने, राजश्री चव्हाण, दिपाली नवले, उज्वला चांदेकर , रोहिणी चौधरी यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.