Mahalunge: कामगारांनीच कंपनीचा पावणे दोन लाखाचा माल चोरला, एकाला अटक

एमपीसी न्यूज – कंपनीतून डिस्पॅच होणारा पावणे दोन लाख रुपयांचा माल चोरून नेण्यात (Mahalunge)आला आहे ही घटना सोमवारी (दि.8) जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट या महाळुंगे येथे घडली आहे.

याप्रकरणी अतुल सुभाष पिंगळे (वय 45 रा.वाकड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge)फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शफिक यासीन पठाण (वय 49 रा.वडगाव मावळ) याला अटक केली आहे. तर त्याचा साथाीदार सनी महादेव भिवरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alandi: माऊली मंदिरात परिचय भागवत धर्माचा… ओळख ज्ञानेश्वरीची या पुस्तिकेचे प्रकाशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे  जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट येथे कामगार आहेत त्यांनी आपापसात संगनमत करून शफिक याच्या ताब्यातील वाहनामध्ये असलेली दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वेगवेगळ्या प्रकारची 1 लाख 81 हजार 242 रुपयांचे पार्ट सिक्युरिटी चेक चुकवून कंपनी बाहेर नेले.पोलिसानी त्यातील एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.