Talegaon Dabhade : सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कंपोस्ट खत विक्रीस सुरुवात

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा, जमिनीचा पोत सुधारावा (Talegaon Dabhade )व सकस केमिकल मुक्त उत्पादन व्हावे या उद्देशाने मावळ अॅग्रो प्रॉडक्टच्या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे.
त्या खत विक्रीचा शुभारंभ गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तळेगाव दाभाडे येथील जिजामाता (Talegaon Dabhade )चौकात झाला. 40 किलो वजनाची पिशवी 1166 रुपयांना असून मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 999 रुपयांना ती उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मावळ अॅग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी दिली.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मावळातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वळावा,जमिनीचा पोत सुधारावा व सकस केमिकल मुक्त उत्पादन व्हावे या उद्देशाने मावळ अॅग्रो प्रॉडक्टच्चा माध्यमातून मावळ समृद्धी सेंद्रिय खताची निर्मिती ही मावळातील दुथ उत्पादक शेतकऱ्यांकडील शेणखत, पोल्ट्री व्यावसायिकांकडील कोंबडी खत,कारखान्यातील प्रेस मड व राखेचा योग्य प्रमाणात वापर करून उत्कृष्ट प्रकारच्या कंपोस्ट खताच्या विक्रीचा शुभारंभ आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या शुभहस्ते व सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Alandi: चंदन उटी द्वारे गणपती मंदिरात श्रीरामाचे तर श्री नरसिंव्ह स्वामी मठात व संत गोरोबा काका मंदिरात गणेशाचे रूप

या वेळी माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, नितीन जगताप,नथुराम वाघमारे, विक्रम दाभाडे,प्रकाश घुले,सचिन जगताप,अक्षय धामणकर,नीरज पवार,संपत दाभाडे व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंद्रिय खताची 40 किलोची पिशवी असून तीची एम आर पी रूपये 1166/- आहे.मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता रूपये 999/ ला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याचे मावळ अॅग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी यावेळी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.