Maval : पतीचे विवाहबाह्य संबंध व त्रासाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीचे विवाहबाह्य संबंध तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे ही घटना सोमवारी मावळ (Maval) तालुक्यातील वराळे या गावात घडली.

Talegav Dabhade : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची इंद्रायणीत उडी मारत आत्महत्या

याप्रकरणी मयत मुलीच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती निर्गुण भोलानाथ तिकडे (वय 26 राहणार वराळे , मावळ) याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 22 वर्षीय मुलीचा आरोपी सोबत लग्न झाले. मात्र मागील तीन महिन्यापासून आरोपी हा मयत मुलीला त्रास देत होता. त्याचे विवाहबाह्य प्रेम संबंध होते याबरोबरच तो मुलीला माहेरून पैसा घेऊन ये असा तगादा लावून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता.

 

त्याच्या या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.